इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे इयत्ता दहावी शिकणारा स्वप्नील मन्मत शिंदे वय पंधरा वर्षे मधल्या सुट्टीनंतर वर्गात जात असताना पहिल्या मजल्यावरून जुन्यासमोर कडून मृत्यू झाल्याचे उपचारांती कळले. अशा प्रकारची माहिती शाळेचे मुख्याध्यापक सुभाष ज्ञानदेव रोकडे यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 24 जुलै 2025 रोजी नेहमीप्रमाणे शाळा सकाळी 11 वाजता भरली दुपारी 2.30 चा ब्रेक होऊन 3.10 ला शाळा भरली. सर्व मुले आपापल्या वर्गात जात होती. यावेळी अचानक इयत्ता दहावीतील स्वप्निल मन्मत शिंदे हा जिन्यासमोर खाली पडला. त्यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी त्या ठिकाणी गोळा झाले. त्याला लगेच गाडीतून मार्श हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यावेळेस डॉक्टरांनी मयत झाल्याची घोषित केले. मयत शिंदे हा कंदरहून दररोज सकाळी सहा वाजता शाळेत जाण्यासाठी टेंभुर्णी येत होता. शाळेचे टाइमिंग अकरा ते पावणे पाच असली तरी प्रायव्हेट ट्युशन असल्यामुळे तो लवकर येत होता. त्याला दोन बहिणी असून आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने कंदर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची माहिती मुख्याध्यापका रोकडे यांनी स्वतः टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हजर राहून दिले आहे.
0 Comments