श्राविका क. महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उमाबाई श्राविका क. महाविदयालय व साने गुरुजी कथामाला महाविद्यालयीन शाखा,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य सुकुमार मोहोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.अविनाश मुळकूटकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र उलगडून सांगितले तसेच ते साहित्यकार व कलावंत म्हणून कसे प्रसिद्ध होते, त्यांचे दलित साहित्याची निर्मिती, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान, त्यांचे प्रसिद्ध लोकनाट्ये, पोवाडे याच्या विषयी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश लेंगरे यांनी केले तर आभार प्रा. सोमनाथ राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा कंगळे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास प्रा. अविनाश मुळकूटकर,प्रा. अर्चना कानडे, प्रा. ज्योती बांगर, प्रा. प्राजक्ता काळे, प्रा. कल्याणप्पा हायगोंडे व महाविदयालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
0 Comments