Hot Posts

6/recent/ticker-posts

संजय गायकवाडांच्या'दादागीरी'मुळे महायुतीची राडासंस्कृती झाली सिध्द

 संजय गायकवाडांच्या'दादागीरी'मुळे महायुतीची राडासंस्कृती झाली सिध्द  

                       


    


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे ‘आमदार निवास’मधील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिळे जेवण दिल्याने संजय गायकवाड यांनी उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले, यावेळी विरोधी पक्षांनी गायकवाड यांना निलंबित करण्याची मागणी केली.

मंत्रालयाजवळील ‘आमदार निवास’मधील उपहारगृहात गायकवाड यांनी  जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर ही घटना घडली. “निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, डाळीतून दुर्गंधी तसेच डाळ आणि भात शिळा होता, म्हणून मारहाण केली,” असे गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट त्या कर्मचाऱ्यालाच मारहाण केली. आमदारांना अशा पद्धतीने जेवण मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण दिले जात असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या मारहाणीनंतर राजकीय वर्तुळातून आरोप होऊ लागल्यानंतरही त्यांनी आपल्याला या कृत्याचा पश्चाताप झाला नसल्याचे सांगून आपल्या कृतीचे समर्थन केले.
आमदार संजय गायकवाड यांचा हा पहिलाच प्रकार नाही. दादागिरी करणे, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठिशी घालतो? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा केला. निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. जर डाळ खराब असेल, तर त्याला जबाबदार कोण? याला तुमचे सरकार जबाबदार आहे. ही डाळ महाराष्ट्रात आदिवासी पाड्यांवर, गोरगरिबांच्या घरात मिळते. मोदी फुकटच धान्य वाटतायत, सगळ्यांनी त्या धान्याची क्वालिटी बघा, असं राऊत म्हणाले.
आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचार्‍यावर राग काढण्याऐवजी तोच राग सरकारवर काढला असता तर जास्त योग्य झाले असते.सर्वसामान्य जनतेला स्वस्त धान्य दुकानातून जे धान्य दीले जाते त्याचा दर्जा तपासला आहे का कधी?शासकीय रूग्णालयांमधून रूग्णांना मीळणार्‍या जेवणाचा दर्जा तपासला आहे कधी?आमदारांना चांगले जेवण मीळाले पाहीजे तसे सर्वसामान्यांनाही मीळाले पाहीजे पण तसे होते का?आणी कोणता आमदार त्याविरूध्द सभागृहात बोलतो का?याचे उत्तर मीळाले पाहीजे.सत्ताधारी आमदारांनी कॅन्टीनच्या गरीब कर्मचार्‍याला मारहाण करण्याऐवजी तीच मारहाण कंत्राटदाराला आणी सरकारी व्यवस्थेला केली असती तर योग्य होते.गुंडगीरी नेहमी सबलांवर दाखवावी,कमजोर आणी गोरगरीबांवर सत्तेचा माज दाखवून मर्दमुकी दाखवू नये.
Reactions

Post a Comment

0 Comments