खा. मोहिते पाटील यांना सकल मुस्लीम समाज करमाळाच्या वतीने निवेदन
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील करमाळा तालुक्यातील दौऱ्यावर आले असताना करमाळा शहरातील मुस्लीम समाजातील विविध मागण्या बाबत भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम फाऊंडेशन आणि सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने निवेदनाद्वारे विविध मागण्याबाबत प्रश्न उपस्थित करून, त्यावर चर्चा करून त्या संदर्भात तसे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली आहे. करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत दफनभूमीसाठी (कब्रस्तान) जागा नाही. याकरिता आपण आमदार नारायण पाटील, सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हा अधिकारी, करमाळा तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात यावी व दफनभूमी करिता ग्रामपंचायत किंवा गायरान मधुन 5 ते 10 गुंठे जागा देण्यात यावी. जेणेकरून त्या त्या गावातील मुस्लीम समाजातील दफनभूमीचा प्रश्न सुटेल. तसेच जेथे दफनभूमी व ईदगाह मैदान आहे तेथे वाॅल कंपाऊंड व सुशोभीकरण करण्याकरिता जिल्हा नियोजन व अल्पसंख्याक विभागातुन निधी देण्यात यावा.
तसेच अनेक अल्पसंख्याक विद्यार्थी करमाळा शहरात शिक्षणाकरिता येतात, त्यांच्याकरिता मदरसा फैजुल कुराण येथे वसतिगृह बांधण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या बरोबरच समाजातील इतर मागण्या बाबत ही सकारात्मक चर्चा झाली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुस्लीम समाजातील सर्व प्रश्नांचा गांभीर्य पुर्वक विचार करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. यावेळी सकल मुस्लिम समाज अध्यक्ष जमीर भाई सय्यद, संस्थापक अध्यक्ष समीर शेख, रोहित पवार फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्तकीम पठाण, जमियत उलमा ए हिंद चे तालुका अध्यक्ष मौलाना मोहसीन, आयशा मस्जिदचे मुफ्ती अबूरेहान, अलीम खान, उस्मान सय्यद ,सलीम माधारी दस्तगीर सय्यद , अलीम खान, शाहिद बेग, समीर सय्यद, कयूम मदारी , मुबारक सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, इकबाल शेख, इम्तियाज पठाण, जहाँगीर बेग, जावेद सय्यद, अरबाज बेग, कलीम शेख, फिरोज बेग, कलंदर शेख, समीर बागवान,आयुब शेख, आरिफ खान, सोहेल पठाण, मिनाज जहागिरदार, सुपरान शेख, अफजल शेख, इकबाल शेख, जहाँ गीर शेख, मोहसीन शेख उपस्थित होते.
0 Comments