Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त पद्धतीने प्रभावी अध्यापन करावे- विस्ताराधिकारी कल्लप्पा अजावडरे

 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त पद्धतीने प्रभावी अध्यापन करावे- विस्ताराधिकारी कल्लप्पा अजावडरे




माढा (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड व गोडी निर्माण व्हावी.त्यांच्या प्रत्येक विषयाच्या संज्ञा,मूलभूत संकल्पनांचे आकलन होऊन ज्ञान व माहिती वृद्धिंगत व्हावी, त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे.या व्यापक व विधायक उद्देशाने शिक्षकांनी शैक्षणिक साधनांचा वापर करून कृतीयुक्त आणि आनंददायी पद्धतीने प्रभावी अध्यापन करावे जेणेकरून विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होऊन ते भविष्यातील सर्व प्रकारच्या स्पर्धेत टिकतील असे प्रतिपादन माढा बीटचे नूतन शिक्षण विस्ताराधिकारी कल्लप्पा अजावडरे यांनी केले आहे.

ते सापटणे-भोसे ता.माढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित सत्काराच्या प्रसंगी बोलत होते.

यावेळी माढा बीटचे नूतन शिक्षण विस्ताराधिकारी कल्लप्पा अजावडरे यांचा सत्कार विठ्ठलवाडीचे प्राथमिक शिक्षक तथा विठ्ठलराव शिंदे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुधीर बाळू गुंड यांच्या हस्ते करण्यात आला.

नूतन शिक्षण विस्तार अधिकारी कल्लप्पा अजावडरे यांनी सहशिक्षक म्हणून 10 वर्षे पदवीधर शिक्षक म्हणून 24 वर्षे,मुख्याध्यापक म्हणून 2 वर्षे सेवा दक्षिण सोलापूर तालुक्यात बजावली आहे. नुकतीच त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेने पदोन्नतीने माढा तालुक्यात माढा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे.यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता,भौतिक सुविधा व शालेय पोषण आहार आदी बाबींची पाहणी व पडताळणी करून समाधान व्यक्त केले.

यावेळी मुख्याध्यापिका सुनंदा तळेकर,संचालक सुधीर गुंड,शफिक बागवान, आबासाहेब कापसे,ईश्वर माळी,फौजीया शेख,विद्या कापरे,दिगंबर गिलविले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments