Hot Posts

6/recent/ticker-posts

शहरातील मालमत्तांची मोजणी सुरू

 शहरातील मालमत्तांची मोजणी सुरू



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील विविध भागांमध्ये दुकान, हॉस्पिटल व घरगुती मिळकतींच्या मिळकतकराची तपासणी महापालिकेकडून करण्यात येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बांधकामांची पाहणी करून मिळकत कर नोंदणीची पडताळणी केली जात आहे. चुकीच्या प्रकारे कर वर्गीकरण झाल्याचे आढळले असून, त्याठिकाणी पुन्हा मोजणी करून अधिकाऱ्यांना अशा मिळकतींची पुन्हा नोंद घेऊन योग्य कर लावण्याचे निर्देश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.


शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत रस्त्यांची दुरवस्था, कडेला पडलेला कचरा आणि मालमत्ता कर वसुलीबाबतची स्थिती याचा आढावा घेतला. रामलाल चौक ते सरस्वती चौक, शुभराय आर्ट गॅलरी ते पोलिस कल्याण केंद्र लिंक रोड, नवी वेस पोलिस चौकी ते व्हीआयपी रोड, पांजरापोळ चौक ते निराळे वस्ती, शेटे वस्ती तसेच निराळे वस्ती ते अॅम्बेसिडर हॉटेल यासह प्रमुख रस्त्यांची पाहणी केली. तसेच दुकान, हॉस्पिटल व घरगुती   मिळकतींच्या मिळकत कराची तपासणी केली. त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बांधकामांची पाहणी करून मिळकत कर नोंदणीची पडताळणी केली. नवीन गाळे झालेल्या ठिकाणी मोजणी करून त्यांची नोंद घेण्याचे आदेश टॅक्स विभागाला दिले. रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यांमुळे  आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण होत आहे. त्यामुळे स्वच्छता विभागाने दररोज ठराविक वेळेत सफाईची कार्यवाही करावी व कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले. यावेळी महापालिकेचे

अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकुलवार, सह अभियंता प्रकाश दिवाणजी, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, विविध विभाग प्रमुख, आरोग्य निरीक्षक, संबंधित अधिकारी उपस्थित होते..

Reactions

Post a Comment

0 Comments