नदाफ नागरी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा 26 रोजी सत्कार सोहळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नदाफ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा संस्थेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सभासदांचे गुणवंत पाल्य तसेच नदाफ पिंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा भव्य सत्कार दिनांक 26 जुलै 2025 रोजी सिद्धेश्वर पेठ येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात येणार आहे. तरी सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी, बारावी व पदवी परीक्षेत 75 टक्के व त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, स्वतःचा फोटो व आधार कार्ड झेरॉक्स इत्यादी कागदपत्रासह दिनांक 20 जुलै 2025 पर्यंत नदाफ नागरी पतसंस्थेच्या सिद्धेश्वर पेठ, कोठाडीया हॉस्पिटल लगतच्या कार्यालयात आणून द्यावे असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन म. सलीम म. हुसेनसाब नदाफ (डी.के.) यांनी केले आहे.
0 Comments