Hot Posts

6/recent/ticker-posts

उत्कर्षा हळींगळे हिचा NEET 2025 मध्ये देशात 193 वा क्रमांक

 उत्कर्षा हळींगळे हिचा NEET 2025 मध्ये देशात 193 वा क्रमांक



सांगली (कटूसत्य वृत्त):- सांगली येथील उत्कर्षा चंद्रशेखर हळींगळे हिने NEET 2025 परीक्षेमध्ये भारतात १९३ वा क्रमांक पटकावत मोठे यश मिळवले आहे. तिने ७२० पैकी ६३३ गुण मिळवून आपल्या मेहनतीचा ठसा उमटवला आहे.

उत्कर्षा ही मिरज येथील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर हळींगळे व डॉ. निशा हळींगळे यांची कन्या आहे. तिचे संपूर्ण शालेय शिक्षण संजय घोडावत ऑलम्पियाड स्कूल , संजय घोडावत मेडिकल अकॅडमी अतिग्रे, कोल्हापूर येथे
 झाले.
आई-वडील दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने लहानपणापासूनच तिला ह्या क्षेत्राची ओढ वाटत होती. त्यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातूनच तिने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्धार केला.
उत्कर्षा हिच्या यशामध्ये संजय घोडावत, विनायक भोसले, वसू, गुप्ता, रेड्डी, उदय , मूर्ती, तुलसी, पूजा मॅडम,साई, सुब्रमण्यम सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले
उत्कर्षा हिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Reactions

Post a Comment

0 Comments