मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-रविवारी अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, आरोपीवर ३०७ चा गुन्हा दाखल करावा यासाठी मराठा समाजाच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक माऊली पवार यांनी दिली.
प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथील एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्यावर समाजकंटक आणि भ्याड हल्ला करून त्यांच्या अंगावर शाही फेकण्यात आली होती व तोंडाला काळे फासले होते ही घटना निंदनीय असून सोलापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात यावा गायकवाड यांना न्याय देण्याकरिता सोलापूरसह राज्यातील मराठा बांधवांनी एकत्र येऊन आरोपीवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडावे याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुढील आंदोलन यावर चर्चा करण्यात येणार आहे.
सोलापूर शहरातील तमाम मराठा बांधवांची मिटिंग उद्या मंगळवार १५ जुलै सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह सात रास्ता येथे आयोजित केली आहे. तरी सर्व मराठा बांधवानी उपस्थित राहावे असे अहवाल सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा सोलापूर. यांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments