अकलूज येथे संजीवन समाधी सोहळ्या निमित्त बैठक संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे सहारा इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये अखिल भारतीय श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ 23 व 24 जुलै 2025 रोजी श्रीक्षेत्र पंढरी नगरीत संपन्न होणारे, श्री संत शिरोमणी नामदेव परिवाराचा 675 व्या संजीवन समाधी सोहळ्या संदर्भात नियोजन बैठक पार पडली. सदर बैठकीत ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज नामदास संत नामदेव महाराजांचे 18 वे वंशज महेश ढवळे अध्यक्ष गणेश उंडाळे, प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.यावेळी अकलूज समाज बांधव व सौ.महिला सदस्यांची लक्षवेधी उपस्थिती ठरली,यामुळे कार्यक्रम मंगलमय , आनंदी प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.
संबंधित कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारलेले डॉ सौ. श्रद्धा राहुल जवंजाळ,या नाना जवंजाळ, किशोर चांडोले, सचिन जवंजाळ, श्रेयस चांडोले, संतोष जामदार,उदय जामदार, पंढरपूर येथील विशाल धट, भारती चांडोले, सारिका जामदार, ऐश्वर्या चांडोले,अश्विनी जामदार, सुनिता चांडोले, लीलावती जामदार,अशा बऱ्याचशा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संजीवन सोहळ्याच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान महेश ढवळे यांनी सर्वांना केले तसेच सूत्रसंचालन डॉ श्रद्धा जवंजाळ यांनी केले.
0 Comments