नागाव - चौल येथे वृक्षारोपण
अलिबाग (कटूसत्य वृत्त):- वनमहोत्सवाचे औचित्य साधून माझे वन माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत नागाव परिमंडळातील मौजे चौल येथील भोवाळे घूमट परिसरात तीन एकर वनजमीनीवर मान्यवरांच्या हस्ते विविध 400 रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी निसर्ग विलीन विलीन अरण्यॠषी मारुती चितमपल्ली यांना उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली .सदर मोहिमेत परिमंडळ अधिकारी प्रभाकर भोईर, नियतक्षेत्र अधिकारी चौल.एम डी तायडे, नियतक्षेत्र अधिकारी नागाव,उदय हटवार तसेच स्थानिक जेष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी, पर्यटक ,व स्थानिक शेतकऱ्यांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
0 Comments