Hot Posts

6/recent/ticker-posts

राणीताई बनपट्टे यांनी उमटविला कर्तुत्ववान कार्याचा ठसा

 राणीताई बनपट्टे यांनी उमटविला कर्तुत्ववान कार्याचा ठसा



अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील सामाजिक कार्यकर्त्या, राणीताई बनपट्टे यांनी समाज कार्यात उत्तुंग भरारी घेत,त्यांनी कर्तुत्ववान कार्याचा ठसा उमटविला आहे.
         सहकार महर्षी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकलूज नगरीत, राणीताई बनपट्टे यांचा जन्म झाला. आयुष्यभरासाठी वाट्याला आलेल्या,अपंगत्वावर मात करत,थोर मोठ्यांचा आदर्श घेत, सामाजिक कार्याचे धडे घेतले.
 जिथे चुकीचे दिसत आहे, तिथे आम्ही गप्प बसणार नाही! चुकीच्या प्रवृत्ती विरुद्ध आमचा लढा असेल, म्हणूनच आम्ही समाजसेवेचा विडा उचलून,जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे असे ठणकावून सांगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या राणीताई बनपट्टे यांचे सर्वस्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
           नियतीने जन्मताच अखंड आयुष्यासाठी,अपंगत्व दिले.परंतु यामुळे निराश न होता प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर राणीताई बनपट्टे यांनी उत्कृष्ट समाज कार्याची धुरा सांभाळली.त्यांनी लोक कल्याणकारी असे अनेक विधायक कार्य करून दाखवले व दाखवत आहेत.समाजकार्य करीत असताना,अत्यंत पारदर्शकपणे अंमलबजावणी करत, राणीताई बनपट्टे यांनी माळशिरस तालुक्यातील पंचक्रोशीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला,आणि तमाम महिला भगिनीसाठी त्या  आदर्श ठरल्या.कोरोना मध्ये त्यांनी अविस्मरणीय असेच कार्य केले,परंतु केलेल्या कार्याची प्रसिद्धी केली नाही.
      संयम, नम्रता, शिस्तप्रिय आणि समस्त समाजासाठी धाऊन जाणाऱ्या राणीताई बनपट्टे या समाज कार्याशी  एकनिष्ठ राहिल्या.सामाजिक पटलावरील रणरागिणी म्हणून राणीताई बनपट्टे यांना ओळखले जात आहे.सध्या त्यांच्या वाट्याला विविध प्रकारचे सामाजिक पदे आलेत परंतु त्या पदांचा कधीच त्यांनी गर्व बाळगला नाही.आज त्या अत्यंत प्रामाणिकपणे स्वस्त धान्य दुकानही चालवतात,तुम्ही स्वस्त धान्य दुकान चालवता, यातून सामाज कार्यासाठी वेळ कसा काढता?असा प्रश्न त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या की,स्वस्त धान्य दुकान  चालविणे सुद्धा समाजसेवाच आहे. स्वस्त धान्य वाटप करताना अनेक महिला भगिनी त्यांच्या समस्या व्यक्त करतात, त्यांच्या अडचणी सांगतात.
त्यांच्यासाठी धाव घेऊन, त्यांचे प्रश्न सोडविणे हे समाज कार्यच झाले.
यामुळेच,जणकल्याणासाठी,समाजसेवेसाठी, सदैव तत्पर असणाऱ्या राणीताई बनपट्टे यांची समाजसेवे बद्दलची आत्मीयता दिसून येते.

चौकट
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे नंदनवन केले. राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय विजयदादासाहेब यांचा राज्याच्या विकासात सिंहाचा वाटा आहे, त्यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे.शिवाय आमदार रणजितसिंह (दादा) मोहिते पाटील, खासदार धैर्यशील (भैय्यासाहेब)मोहिते पाटील व अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह (बाबा) मोहिते पाटील हे तीन रत्न अमूल्य,अनमोल आहेत.यांचेकडून समाज कार्याची प्रेरणा मिळत आहे.यापुढे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी काम करत राहणार आहे.
राणीताई बनपट्टे
सामाजिक कार्यकर्त्या अकलूज
Reactions

Post a Comment

0 Comments