सीआयओची मुले करणार शहरात 1 हजार वृक्ष लागवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चिल्ड्रन इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या (सीआयओ) वतीने लहान विद्यार्थी देशभरात दहा लाख वृक्ष रोपण करण्याचे पर्यावरण पूरक अभियान राबवीत आहेत. या अंतर्गत सोलापूर शहरात सीआयओची मुले 1 हजार वृक्षारोपण करणार आहेत, अशी माहिती या अभियानातील विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशभरात दि. 25 जून ते 26 जुलै 2025 दरम्यान हे अभियान राबविण्यात येत आहे. सीआयओ हे एक राष्ट्रीय विचारपीठ आहे. इस्लामी मूल्यावर आधारित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यात येते. या वृक्षारोपण अभियानाद्वारे या मुलांमध्ये निसर्ग प्रेम, जबाबदारी, सेवाभाव आणि देशसेवेची भावना निर्माण होईल. याबरोबरच हरित प्रतिज्ञा, शुक्रवारी निसर्ग संवर्धनावर प्रवचन, नेचर वॉक्स व अभ्यास दौरे, चित्रकला, कविता, कथाकथन स्पर्धा, सोशल मीडिया, व्हिडिओ तयार करणे आदी उपक्रमही राबविण्यात येत आहेत. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन व धर्मगुरू यांनी ऐतिहासिक वृक्षारोपण अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी या विद्यार्थ्यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेत इक्बाल शेख, लुकमान शेख, मो.साद मुल्ला, कौनिता शेख, अम्मार शेख आदी विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments