ऑर्किडच्या प्रांगणात अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागेश करजगी ऑर्किड स्कुलमध्ये वारकऱ्यांच्या वेशभुषेतील लहान मुले,पालखी मिरवणूक आणि विठू नामाच्या गजरात नेत्रदीपक असा रिंगण सोहळा अनुभवताना काही क्षण आपण ब्रह्मांडनायक साक्षात विठूरायाच्या पंढरीतच आलो आहोत असे वाटत होते.निमित्त होते आषाढी एकादशी.या पार्श्वभूमिवर नागेश करजगी ऑर्किड स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली.यावेळी संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते, संस्थेच्या विश्वस्त नंदिनी करजगी, ,स्कुलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी,स्कुलच्या मार्गदर्शिका मीना पारखे,प्राचार्या रुपाली हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर संगीतमयी नृत्य सादर करीत असताना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले.विठ्ठल रखुमाई,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, संत नामदेव,संत सोपानकाका ,संत मुक्ताबाई या संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी,नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन,पांढऱ्याशुभ्र वेषात कपाळाला बुक्का लावून निघालेले छोटे वारकरी त्यांच्या मुखातून निघणारा विठू नामाचा जयघोष करीत शाळेच्या आवारातून निघालेला पालखी सोहळा जुनी मिल परिसर मार्गे वीज वितरण कार्यालयाजवळील महादेव मंदिराला प्रदिक्षणा घालून शाळेच्या आवारात दाखल झाली. यावेळी शालेय परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती चाटी यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments