Hot Posts

6/recent/ticker-posts

देशात सुमारे २.६ कोटी लोकांना रोजगार निर्मितीचा लाभ मिळणार

 देशात सुमारे २.६ कोटी लोकांना रोजगार निर्मितीचा लाभ मिळणार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रोजगार, कौशल्य आणि इतर संधी सुलभ करण्यासाठी पंतप्रधानांच्या ५ योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजना (एम्प्लॉयमेंट लिंक इंटेन्सिव्ह स्कीम ELI) जाहीर करण्यात आली. देशात सुमारे २.६ कोटी लोकांना रोजगार निर्मितीचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी सोलापूर विभागाचे आयुक्त पुरुषोत्तम मीना यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
       पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने १ जुलै २०२५ रोजी याला मंजुरी दिली. रोजगार निर्मिती, रोजगार करण्याची क्षमता, सामाजिक सुरक्षा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या पहिल्या भागात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालय (पीएफ) मध्ये नोंदणीकृत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन या भागात १५ हजार रुपयांपर्यंतचा एक महिन्याचा ईपीएफ पगार दोन हप्त्यांमध्ये दिला जाईल. याचा फायदा सुमारे १.९२ कोटी पहिल्यांदाच नोकरी शोधणाऱ्यांना होईल. तसेच या योजनेच्या दुसऱ्या भागात किमान ६ महिने सतत नोकरी करणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त (नव्या) कर्मचाऱ्यांसाठी नियोक्त्याला २ वर्षांसाठी दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. देशात सुमारे २.६ कोटी लोकांना रोजगार निर्मितीचा लाभ मिळणार आहे.
उत्पादन क्षेत्रासाठी दुसऱ्या भागातील प्रोत्साहन तिसऱ्या आणि चौथ्या वर्षापर्यंत देखील वाढवले जाईल. पहिल्या भागातील लाभ कर्मचाऱ्यांना आधार ब्रिज पेमेंट सिस्टम वापरून डीबीटी पद्धतीने पेमेंट केले जाईल.
 दुसऱ्या भागातील लाभाचे पेमेंट नियोक्त्याला थेट त्यांच्या पॅन लिंक्ड खात्यात केले जाईल अशी पेमेंटची पद्धत आहे.
       ५० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या ईपीएफओमध्ये नोंदणीकृत आस्थापनांना किमान सहा महिने सतत आधारावर किमान दोन अतिरिक्त कर्मचारी (नवे रोजगार) किंवा ५० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या नियोक्त्यांसाठी पाच अतिरिक्त कर्मचारी  नियुक्त करावे लागतील. त्यांना तीन हजार रुपये लाभ शासन देणार आहे. जास्तीत जास्त आस्थापना, नियोक्ता, वर्कर, ट्रेड युनियन यांनी या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करावा. जास्तीत जास्त लोकांना रोजगार द्यावा. पीएफ रजिस्ट्रेशन करावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त पुरुषोत्तम मीना यांनी केले आहे.
     या पत्रकार परिषदेत लेखा अधिकारी प्रतीक लाखोले उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments