विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 13, 2025

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

 विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न



अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माजी संसद सदस्य (लोकसभा) विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त गुरूवार दि.12 जून 2025 रोजी, सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना व विजयरत्न सहकारी पशु-पक्षी संवर्धन संघ या संस्थांमार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन कामगार कल्याण केंद्र, शंकरनगर येथे करणेत आले होते.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन शंकरनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यशील राजसिंह मोहिते-पाटील, यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर प्रसंगी इंडियन मेडिकल असोशिएशन, अकलूजचे डॉ.संतोष खडतरे, ब्लड बँकेचे डॉ.अजित गांधी व त्यांचेकडील स्टाफ त्याचबरोबर कारखान्याचे अधिकारी, युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते. 
रक्तदान शिबीरामध्ये कारखाना व विविध संस्थांचे कर्मचारी, शंकरनगर परिसरातील युवक, महिला, नागरीक यांनी रक्तदान शिबीरामध्ये सहभाग घेऊन रक्तदान केल्याने मानवी जीव वाचविण्यास मदत होईल, अशा सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी आभार मानले. 
सदर रक्तदान शिबीर आयोजन करणेकरीता सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, विजयरत्न सहकारी पशु-पक्षी संवर्धन संघ या संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी व कामगार युनियन यांनी सहकार्य केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages