मोठ्या उत्साहात विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 13, 2025

मोठ्या उत्साहात विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस साजरा

 मोठ्या उत्साहात विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस साजरा



अकलूज (कटूसत्य वृत्त):- माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा ८१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला .विजयसिंह यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे निवासस्थान शिवरत्न बंगल्यावर राज्यभरातून समर्थकांची मांदियाळी जमा झाली होती .त्याशिवाय वृक्षारोपण , अन्नदान ,रक्तदान शिबिरे असे सामाजिक कार्यक्रमही घेण्यात आले .
सकाळी विजयसिंह यांच्या पत्नी नंदिनीदेवी मोहिते - पाटील , स्नुषा सत्यप्रभादेवी मोहिते -पाटील , कन्या रेणुकादेवी कर्णिक आणि परस्नुषा शिवांशिका मोहिते - पाटील यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. त्यानंतर विजयसिंह यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, रामराजे नाईक - निंबाळकर ,संजीवराजे नाईक - निंबाळकर ,खासदार अमोल कोल्हे ,माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार दिलीप सोपल,गुलाबराव पोळ, संजय जोग ,मुंबई ,संभाजी पाटील सांगली ,प्रशांत पवार  मालेगाव , माजी आमदार दीपक चव्हाण ,प्रमिला लोदगेकर ,अनिल देसाई मान ,भाजपच्या जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवळकर ,इंदोरचे कुशल शर्मा , जळगावचे दीपक पाटील , उमेश पाटील मोहोळ, नितीन भरगुडे पाटील सातारा ,माजी महापौर नसीम पठाण, बाळासाहेब शिंदे ,स्वीकृत खांडेकर ,डॉ . वीरेंद्र पाटील बिदर, अतुल कुलकर्णी ,जयवंतराव जगताप ,नंदकुमार पाटील विटा , नितीन शेळके इंदोर ,संतोष पाटील श्रीगोंदा ,प्रमोद जोशी वीरसेन जाधवराव भुईंज ,अब्दुल चौधरी सोलापूर ,सुरेश पवार फलटण, नितीन शेटे राशीन, बाबासाहेब क्षीरसागर, संतोष खरतडे ,तानाजीकाका पाटील यांनी मोबाईलवर शुभेच्छा दिल्या तर भारत आबा पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, नागपूरचे संग्रामसिंह राजे -भोसले ,खासदार धैर्यशील मोहिते पाटील ,आमदार नारायण पाटील , आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजीत पाटील ,आशुतोष आगाशे, ब्रीमा सागर डिस्टलरीचे संचालक भरतकुमार सेठीया, दिनकर बेंबळकर ,राजेसाहेब देशमुख बीड ,राजू सुपाते, ॲड. वजीर शेख ,संजय कोकाटे ,मनोहर डोंगरे ,वसंतनाना देशमुख, ॲड . दीपक पवार , आप्पासाहेब जगदाळे , सुभाष रावणगावकर नांदेड ,उदय प्रतापसिंग मुंबई ,धनाजी साठे ,दिग्विजय बागल ,विलास घुमरे ,भाऊसाहेब आंधळकर .मल्लिकार्जुन पाटील ,हरिभाऊ मंगवडे कंदर शहाजीराव देशमुख करमाळा ,शिवाजीराव बंडगर यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच पक्षातील पदाधिकारी व मोहिते -पाटील समर्थकांनी विजयसिंह यांना शालेय साहित्य देऊन शुभेच्छा दिल्या. सहकार महर्षी साखर कारखाना व विजयरत्न पोल्ट्री संघयांच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले .कारखान्याच्या वतीने सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी विजयसिंह यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या. शिवामृत दूध संघाच्या वतीने अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते -पाटील व संचालक मंडळाने आणि अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे शिवरत्न शिक्षण संस्था, शिवपार्वती ट्रस्ट, विजय गणेशोत्सव ट्रस्ट यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या .श्री शंकर कारखान्याच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने टेंभुर्णी येथील वृद्धाश्रमात अन्नदान केल्याचे ॲड. वजीर शेख यांनी सांगितले .सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच -उपसरपंच सदस्य नगरपरिषद - नगरपंचायतींचे पदाधिकारी यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे अभिष्टचिंतन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages