हृदयद्रावक! अहमदाबाद विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू
अहमदाबाद (वृत्त सेवा):- अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. हे प्रवासी विमान मेघानीनगर या रहिवाशी परिसरात कोसळले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांनी याबाबतची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे. सर्वच्या सर्व प्रवासी यांच्या मृत्यू झाला आहे.
दुपारच्या सुमारास अहमदाबाद वरून लंडनला जाणारे विमान हे मेघानीनगर भागात कोसळले. अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. यामध्ये 15 डॉक्टर देखील जखमी झाले आहेत. दरम्यान अहमदाबादच्या पोलिस आयुक्त यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील प्रवास करणारे सर्व प्रवाशी मृत्युमुखी पडले आहेत.
अहमदाबाद प्लेन क्रॅश दुर्घटनेवर PM नरेंद्र मोदीचे ट्वीट
अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेने आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की जी शब्दांत सांगता येत आहे. या कठीण प्रसंगी यामध्ये प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत. या घटनेत प्रभावित झालेल्या बंधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे.
सोशल मीडियावर हृदयद्रावक व्हिडिओ
गेल्या काही तासांपासून अपघाताशी संबंधित व्हिडिओ आता समोर येत आहेत आणि हे व्हिडिओ खूपच भयानक आहेत. या व्हिडिओमध्ये फक्त ज्वाला आणि धूर दिसत आहे. अपघातानंतर बचाव कार्य सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. यादरम्यान, काही जखमींना व्हीलचेअरवर तर काहींना स्ट्रेचरवर नेताना दिसले आहे आणि या घटनेचे व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहेत. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळाभोवती मोठी गर्दी जमली असल्याचेही दिसून आले आहे. लोक रस्ता मोकळा करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे.
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण काय?
अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. मात्र हे विमान कशामुळे कोसळले आहे, याचे स्पष्ट कारण अजूनही समोर आलेले नाही.
विमानात किती प्रवासी होते?
अहमदाबाद-लंडन हे प्रवासी विमान कोसळले आहे. उड्डाण केल्या केल्या ७ मिनिटांमध्ये हे विमान कोसळले आहे. दरम्यान ३०० प्रवासी क्षमता असलेल्या या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करतासल्याची माहिती समोर येत आहे.
इमारतीवर आदळल्याने विमान कोसळले
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. आता या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या देशाचे किती प्रवासी?
एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहानमुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पायलटचे नाव काय? किती होता अनुभव?
समोर आलेल्या माहितीनुसार, या विमानाच्या पायलटचे नाव कॅप्टन सुमित सभरवाल आहे. सुमित यांना ८२०० तास विमान उडवण्याचा अनुभव आहे. तसेच या विमानाच्या सह-वैमानिकाला ११०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने अहमदाबादहून धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर लगेचच ते विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.
0 Comments