साेलापूरातील १५ दुकानांचे खत परवाने निलंबित, एक परवाना कायमचा रद्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 27, 2025

साेलापूरातील १५ दुकानांचे खत परवाने निलंबित, एक परवाना कायमचा रद्द

 साेलापूरातील १५ दुकानांचे खत परवाने निलंबित, एक परवाना कायमचा रद्द
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दुकानातील साठा व पॉज मशिनमधील विक्री यामध्ये तफावत आढळल्याने सोलापूर शहरातील एका कृषी निविष्ठा दुकानाचा खत विक्री परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर अभिलेख पूर्ण नसलेल्या इतर ११ दुकानाचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत.
चालू कृषी हंगामात एकूण १५ दुकानांचे खत विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीच्या तोंडावर मिश्र खतांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने शहर व जिल्ह्यातील खत विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली. या तपासणीमध्ये १२ दुकानांमध्ये त्रुटी आढळल्या. यामध्ये अभिलेख पूर्ण नसणे, विक्री व साठ्यात तफावत असणे यासारख्या गंभीर बाबी समोर आल्या. यामुळे या दुकानांचे परवाने काही काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.
यामध्ये शहरातील बसवेश्वर कृषी केंद्राबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्याने या दुकानाच्या खत विक्रीचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये इतर दोन दुकानांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. जिल्हा भरारी पथक व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. यापुढेही कारवाई सुरू राहील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या दुकानांवर झाली कारवाई
ओमसाई कृषी केंद्र (सादेपूर), जय मल्हार अॅग्रोटेक (पंढरपूर), अभिराज कृषी सेवा केंद्र (सोनके), धनश्री कृषी सेवा केंद्र (वडकबाळ), कट्टेवादेवी कृषी केंद्र (वडकबाळ), मनीषा अॅग्रो सेंटर(सोलापूर), महाराष्ट्र अॅग्रिकल्चर कन्सलटंसी (सोलापूर), शहा कृषी भांडार (करजगी), शेतकरी कृषी भांडार (वळसंग), सोमेश्वर कृषी केंद्र (हत्तूर), मायक्का कृषी केंद्र (टाकळी)
खत विक्रीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे ११ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. याबाबत सुनावणी घेतल्यानंतरच पुढील कारवाई होईल. खत दुकानाच्या तपासणीची मोहीम सुरूच राहणार असून गेल्या वर्षी जवळपास ७३ परवाने निलंबित करण्यात आले होते.
- बाळासाहेब बागल, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, सोलापूर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages