"तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही" - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 27, 2025

"तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही"

 "तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही"



भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान


मुंबई (कटूसत्य वृत्त):- भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. एका गावातील कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी हे विधान केले. या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

"तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले, तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत", असं वादग्रस्त विधान लोणीकर यांनी केलं आहे.

एका कार्यक्रमात बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यां संदर्भात वादग्रस्त विधान केले. "ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?", असं वादग्रस्त विधान आमदार लोणीकर यांनी केले.

विरोधकांची टीका

आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन लोणीवर यांच्या टीका केली. "भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर उपकार करत असल्याची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या पक्षाचे संस्कार दर्शवते. एकीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का? भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?, अशी टीका आमदार पवार यांनी केली.

"निवडणुकीआधी नरमी दाखवणारे, कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्ता मिळवणारे आता शेतकऱ्यांवरच खालच्या भाषेत बोलून गुरगरत असतील तर अशा लबाड लांडग्यांना शेतकऱ्यांचा आसुड दाखवावाच लागेल, असंही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages