खबरदार ! शासकीय कार्यालयात वाढदिवस कराल तर... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 28, 2025

खबरदार ! शासकीय कार्यालयात वाढदिवस कराल तर...

 खबरदार ! शासकीय कार्यालयात वाढदिवस कराल तर...

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांपासून वाढदिवस साजरे करण्याचे लोण वाढले आहे. अनेक शासकीय कार्यालयातही कर्मचारी आणि अधिकारी वाढदिवस साजरे करीत असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वाढदिवस असल्यास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे रखडून पडत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे कोणत्या ही शासकीय कार्यालयात अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरे करु नयेत, असे परिपत्रक जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहे.


वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी हे शासकीय कार्यालयात व कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक समारंभ अथवा वाढदिवस साजरा करीत असल्यामुळे कार्यालयीन कामकाजाचा वेळ वाया जात आहे. विविध कामानिमित्त कार्यालयात आलेला अभ्यागतांचा, नागरिकांचा वेळ वाया जात आहे. लोकांना तासन्तास तिष्ठत थांबावे लागत आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी

वैयक्तिक सण समारंभ अथवा वाढदिवसाचे कार्यक्रम कार्यालयीन वेळेत साजरे करु नयेत, असे या परिपत्रकात म्हटले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages