प्रभाग क्रमांक २२ परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 14, 2025

प्रभाग क्रमांक २२ परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

 प्रभाग क्रमांक २२ परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश  युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत १८ लाख २८ हजार रुपये खर्चित येथे यतिमखाना परिसरात रस्ता कॉंक्रिटकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी एजाज शेख, महबूब पठाण, इरफान शेख, बिलाल शेख इमरान मंडपवाले जुबेर शेख, जमीर शेख,मोहीम शेख, कुरेशी, निराशा शेख, मीराशाब शेख, उमर शेख, जब्बार शेख,, सय्यद चाचा, सद्दाम शेख, केशरबाई मणियार, शामला ताई जाधव,अन्नपूर्णा जाधव, शहजाद शेख,मालानबी शेख, बिलाल शेख, रियाज शेख, सलीम शेख, महादेव राठोड,वसंत कांबळे,फिरोज पठाण, आनंद गाडेकर, सुहास सर जाधव आदींच्या उपस्थितीत या रस्ता कामाचे विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आले. प्रभाग क्रमांक 22 मधील यतिम खाना परिसरात बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला मुर्त स्वरूप प्राप्त झाले. येथील रहिवाशांच्या मागणीनुसार रस्ता कामाचे आज शुभारंभ करण्यात आले.रखडलेल्या रस्त्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे पावसाळ्यात साचणारे पाणी चिखल खड्डे आणि वाहनधारकांचे अपघात यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे विकास कामांमध्ये गुणवत्ता हा सर्वोच्च निकष असावा ठेकेदारांनी कोणतेही तडजोड न करता वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करावे असा सल्ला देखील यावेळी ठेकेदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी या शुभारंभ प्रसंगी दिले. या पुढील काळात देखील प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या माध्यमातून या पुढील काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले. दरम्यान यावेळी प्रभागातील नागरिकांनी किसन जाधव यांचे आभार मानत प्रसिद्ध किराणा दुकानदार परिसरातील ज्येष्ठ नागरिक होन्कुळे मामा आणि त्यांचे चिरंजीव काशिनाथ होन्कुळे यांच्या उपस्थितीत फटाक्यांची कडकडाट करत भला मोठा पुष्पहार घालून त्यांचे सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुढील काळात प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या रस्ता कॉंक्रिट करून कामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रभाग क्रमांक २२ मधील आबाल वृद्धांसह नागरिकांची उपस्थिती होती.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages