Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडला सलग दुसऱ्या वर्षी ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार २०२५

 प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडला सलग दुसऱ्या वर्षी ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार २०२५


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नामांकित व अग्रगण्य औद्योगिक संस्था प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड ने यंदा पुन्हा एकदा आपली गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक कार्यप्रणाली सिद्ध करत ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार 2025’ पटकावला आहे. विशेष म्हणजे, हा पुरस्कार कंपनीला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला असून, ‘एक्सलन्स इन इन्व्हायर्मेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स (ESG)’ या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा प्रिसिजनचा सन्मान झाला आहे. दि. २६ जून रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिसिजन कंपनीच्या वतीने कंपनीचे सिनिअर सेफ्टी मॅनेजर सुहास पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला.

टाइम्स ग्रुपतर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार, देशभरातील विविध उत्पादन व औद्योगिक कंपन्यांच्या शाश्वत विकास, सामाजिक उत्तरदायित्व आणि प्रभावी प्रशासकीय व्यवस्थेच्या मूल्यमापनावर आधारित असतो. इन्व्हायर्मेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडने सातत्याने उल्लेखनीय योगदान दिले आहे. कंपनीच्या या कामगिरीमुळे ती इतर उत्पादन क्षेत्रांसाठी आदर्श ठरली आहे.

सोलापूरसारख्या मध्यवर्ती शहरातील एक उद्योग संस्था सलग दोन वर्षे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराची मानकरी ठरणे, ही गोष्ट संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. जागतिक दर्जाच्या कामगिरीमुळे प्रिसिजन बरोबर सोलापूर चे नाव औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे. ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर अवॉर्ड 2025’ हा फक्त एक पुरस्कार नव्हे, तर प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडच्या सतत प्रगतीशील, जबाबदार आणि मूल्याधिष्ठित औद्योगिक कार्यसंस्कृतीचं प्रमाणपत्र आहे. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या गौरवामुळे कंपनीच्या नीतिमूल्यांवरील निष्ठेची राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा दाखल घेतली गेली.

यतिन शहा,व्यवस्थापकीय संचालक

सतत नावीन्यपूर्णतेकडे झुकणारी आणि नीतिमूल्यांवर ठाम असलेली संस्था म्हणून प्रिसिजनने पुन्हा एकदा देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे. सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाल्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून, ही प्रेरणा घेऊन आम्ही अधिक जोमाने नीती मूल्यांचे पालन करू.

Reactions

Post a Comment

0 Comments