माकप कडून पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 20, 2025

माकप कडून पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन

 माकप कडून पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांनी मराठी साहित्यविश्वात एक लाख नव्या शब्दांची जी भर घातली ती भर आजवरच्या मराठी साहित्य विश्वात सर्वात मोठी अभिनव क्रांती समजण्यात यावी. निसर्ग आणि निसर्गाशी निगडीत सर्व समावेश घटकांवर सहज आकलन होईल, असे समृद्ध लेखनाचा विक्रम मारुती चित्तमपल्ली यांचा नावे आहे. जल ,जंगल, जमीन ही आदिवासी बांधवांसाठी निसर्गदत्त देणगी आणि वडिलोपार्जित संपत्ती असून त्याचे संवर्धन करणे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आहे. मात्र, यामुळे निसर्गाचे समतोल कायम राहील. यासाठी स्वतः वन संवर्धन चळवळीत अव्याहतपणे आजही कृतिशील आहेत. अर्थातच हे अभिनव व अभूतपूर्व विशेष निसर्ग संशोधन त्यांनी केलेला आहे. यांचा गौरव पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात यावा. अशी पहिल्यांदा महामहीम राष्ट्रपती , भारत सरकारकडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. नुकतेच त्यांना  भारत सरकार मार्फत महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.ही सोलापूर च्या वैभवात भर टाकणारी भूषणावह बाब आहे.मात्र  काल रात्री ते अनंतात विलीन झाले.ही ही अत्यंत दुःख द घटना आहे.त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशा शब्दांत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व तमाम श्रमिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 

पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचे कार्य आणि लेखन बाबत नमूद करताना आडम म्हणाले की, मारुती चितमपल्ली यांनी अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलुगु भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे.चितमपल्ली यांनी पक्षीशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे. जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी असा शब्द आहे. चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे, ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत) ला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी) चे रायमुनिआ तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्ली यांच्यामुळे नागरी वाचकांस माहित झाले. 

यावेळी त्यांच्या राहत्या घरी माकपचे राज्य समिती सदस्य कॉ ॲड अनिल वासम व विरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसूरे आदींनी पार्थिवाचे दर्शन घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages