विमानसेवेमुळे मीळणार जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 20, 2025

विमानसेवेमुळे मीळणार जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना

 विमानसेवेमुळे मीळणार जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला  चालना 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरकरांसाठी विमानसेवा सूरू होण्याचा दीवस ऐतिहासिक  ठरला. येथील विमानतळावरून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा हा देशाच्या हवाई क्षेत्राशी जोडला गेला. यातून सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू केली जाणार असल्याची ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
 सन 2014 च्या आधी देशात 74 विमानतळ होते. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 162 विमानतळ विकसित केले आहे, असे मंत्री मोहोळ यांनी सांगितले.
विमानसेवा सोलापूरच्या उद्योग, व्यवसाय व पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या टप्प्यात सोलापुरातून गोव्यासाठी सेवा सुरू होत आहे. गोव्यातून देश व विदेशात सर्व ठिकाणी विमानाने प्रवास करणे शक्य होणार आहे. आता सोलापुरातून मुंबईसाठी विमान सेवा सुरू करण्याची गरज आहे.
 सोलापूर विमानतळावर वातावरण स्पष्टतेबाबत तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही यासाठी डीवॉल सिस्टीम बसवणे तसेच नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करणे या अनुषंगाने पुढील काळात काम केले जाणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूरहून मुंबईसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे. सोलापूर विमानतळावरून आता केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत तिरुपती, हैदराबाद व बंगळूरसाठीही विमानसेवा लवकरच सुरू केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी मोहोळ यांनी केली.
सोलापूर विमानतळावरून लवकरच मुंबईसाठी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी भाषणात सांगितले. तरी विमानतळ परिसरात आगामी विमानसेवेविषयी फ्लेक्स उभारण्यात आले होते. मुंबईसाठी लवकरच सोलापुरातून विमानसेवा सुरू होणार, या मजकुरासह त्यावर स्टार एअर लाईन्सचाही उल्लेख होता. त्यामुळे लवकरच सोलापुरातून सुरू होणारी मुंबई विमानसेवा ही स्टार लाईन्सची असणार असल्याचे स्पष्ट झाले.सोलापूरातून विमानसेवा सुरू झाल्याने औद्योगीक विकास वेगात होणे अपेक्षीत आहे.जिल्ह्यातील कृषी क्षेत्रालाही याचा फायदा होईल.याबरोबरच बहुराष्ट्रीय कंपन्या शहरात येण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने आता जिल्ह्यातील नेतृत्वाने औद्योगीक आघाडीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.याआधी विमानसेवा सुरू झाली पण काही दीवसांपुरतीच आता तसे न होता ही विमानसेवा कायमस्वरूपी चालण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.सोलापूरातील  
गारमेन्ट व्यवसायाला या विमानसेवेचा फायदा होईल याबरोबरच नवे उद्योग शहरात येण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.याबरोबरच बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळालाही गती देण्याची गरज असून भाजप शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.राजकारण बाजूला ठेऊन शहर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रीत प्रयत्नांची गरज आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages