हरित मार्गावरील झाडांची कत्तल; पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावरील वडाची झाडे तोडली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 20, 2025

हरित मार्गावरील झाडांची कत्तल; पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावरील वडाची झाडे तोडली

 हरित मार्गावरील झाडांची कत्तल; पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावरील वडाची झाडे तोडली

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- ऑक्सिजन मार्ग म्हणून नावारूपाला येत असलेल्या मंगळवेढा-पंढरपूर हरित पालखी महामार्गावरील बाजार समितीसमोरील बसथांब्याजवळील पन्नास फूट उंचीची दोन वडाची झाडे शुक्रवारी रात्री अज्ञातांकडून तोडण्यात आली.
ऐन वारी काळात अशा प्रकारे झाडांची कत्तल केल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा घडा लावून दोषींना कडक शासन करण्याची मागणी वारी परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत पंढरपूरची वारी हरितवारी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व वारी परिवार यांच्या सहकार्यातून वृक्षलागवड करण्यात आली. जनावरांपासून रक्षण करण्यासाठी जाळी बसविण्यात आली. झाडे लहान असताना उन्हाळ्यात वारी परिवाराने टँकरद्वारे पाणी घालून झाडांचे जतन केले.
वृक्ष लागवडीत लोकांचा सहभाग वाढावा म्हणून दरवर्षी या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना देखील त्यांनी चालवली. सध्या झाडांची झालेली वाढ पाहता अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मंगळवेढा पंढरपूर मार्ग वडाच्या झाडामुळे ऑक्सिजन मार्ग म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास देखील व्यक्त केला. मात्र शुक्रवारी झाडे तोडून पंढरपूर रोडवरील औद्योगिक वसाहतीत टाकत विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वारी परिवाराच्या वतीने ही पाहणी करून संबंधित विभागाला माहिती दिली. वृक्षतोड करणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी वृक्षप्रेमींच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व वारी परिवार यांच्या वतीने पंढरपूरची वारी हरित वारी होण्यासाठी पालखी महामार्गावर वृक्ष लागवड केली होती. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
- सुहास पवार, उपसरपंच, संत चोखामेळानगर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages