महिनाभरात पाणी रोटेशन एक दिवसाने कमी होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 20, 2025

महिनाभरात पाणी रोटेशन एक दिवसाने कमी होणार

 महिनाभरात पाणी रोटेशन एक दिवसाने कमी होणार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अर्धा तास पाणीपुरवठ्याची वेळ कमी करून येत्या महिनाभरात शहराचा पाणीपुरवठा एका दिवसाने कमी करण्याचे नियोजन महापालिकेकडून सुरू आहे. ज्या भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा आहे त्या ठिकाणी चार दिवसाआड आणि ज्या ठिकाणी चार दिवसाआड पाणीपुरवठा आहे त्या ठिकाणी तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहराला लवकरच तीन दिवसाआड पाणीपुरवठा शक्य होणार असल्याचे सांगितले होते. त्यादृष्टीने महापालिकेने निर्णय घेतला आहे. उजनी-सोलापूर दुहेरी जल-वाहिनीची चाचणी प्रक्रिया सुरू आहे. सोरेगाव जल शुद्धीकरण केंद्र येथे दोन दिवसांपूर्वी पाणी पोहोचले आहे.

सोलापूर शहराला सध्या पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सध्या पाण्याच्या दिवशी साडेतीन तास पाणीपुरवठा केला जातो. महिनाभरात याचे नियोजन बदलण्यात येईल. साडेतीन तास ऐवजी तीन तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने शहराचा एक दिवसाने पाणीपुरवठा कमी करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages