...वादळी वाऱ्या मुळे शेतकऱ्याचे सोलार ऊर्जाचे संचाचे मोठे नुकसान......! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 20, 2025

...वादळी वाऱ्या मुळे शेतकऱ्याचे सोलार ऊर्जाचे संचाचे मोठे नुकसान......!

 ...वादळी वाऱ्या मुळे शेतकऱ्याचे सोलार ऊर्जाचे संचाचे मोठे नुकसान......! 

अकोला (कटूसत्य वृत्त):-मुर्तीजापुर पंचायत समिती अंतर्गत ग्राम शिरसो से शिवारात शेतकरी मदन मोहनलाल दुबे यांच्या शेतातील गट नंबर 322 /1 शिरसो भाग दोन मधील दिनांक 19/6/25 अचानक दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसामुळे त्यांच्या शेतातील सौर ऊर्जा संचाचे वाऱ्यामुळे तुटतात झाले आहे. त्यामुळे ऊर्जा संचाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांनी त्यांच्या शेतात सौर ऊर्जा संच दिनांक 28 /9/2020  रोजी  सोपन सोलर पंप लिमिटेड पुणे या कंपनीचे सोलर ऊर्जा संच लावण्यात आले. त्यांचा आयडी नंबर.  501333210022663 हा असून तुटलेल्या सौर ऊर्जा प्लेट व संपूर्ण इस्टिमेट क्षितिजाग्रस्त असल्यामुळे त्यांनी आपल्या शेतात रब्बी हंगामासाठी कापूस तूर, सोयाबीन या पिकांची पेरणी केली असून. त्यांच्या विहिरीला मुबलक पाणी असून सुद्धा त्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. तरी सोपंन  सोलर  ऊर्जा कंपनीकडून  या सोलर संचाची दुरुस्ती करून त्यांना सिंचनाची उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने कंपनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तरी सोपान सौर ऊर्जा  कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages