हेल्थ कॅपिटल ऑर्थोपेडिक आणि गायनॅक
सुपर स्पेशालिटी चा मोफत आरोग्य तपासणी शिबिर
प्रामुख्याने सर्व स्त्रीरोग व कृत्रिम सांधेरोपण गुडघ्याचे रोबोटिक तंत्रज्ञानाने मोफत तपासणी केले जाईल.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आरोग्याच्या दृष्टीने सध्या नागरिक खूपच सेनसेटिव्ह झालेले आहेत. त्यांना योग्य सुविधा मिळावेत म्हणून सुप्रसिद्ध अशा सिटी हॉस्पिटल चे मार्गदर्शक डॉक्टर संजय दंतकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे डॉक्टर केतकी पाटील यांनी सांगितले.
सदर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील सिटी हॉस्पिटल मध्ये सोमवार दिनांक 23 जून 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत तपासणी सुरू असणार आहे. तसेच सर्व स्त्रीरोग व कृत्रिम सांधेरोपण गुडघ्याचे रोबोटिक तंत्रज्ञानाने मोफत तपासणी केले जाईल.
या शिबिरात प्रामुख्याने पुढील तपासण्या मोफत केल्या जातील यात ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपी, हाडाची घनता आणि विटामिन डी तपासले जाईल. तसेच स्त्रियांकरिता अनियमित मासिक पाळी रक्तस्त्राव रजो निवृत्तीनंतरची अवस्था, गर्भधारणेतील गुंतागुंत, खालच्या ओटीपोटात वेदना, ल्युकोरिया ( पांढरा स्त्राव पी व्ही ) व कर्करोग स्क्रीनिंग अशा तपासण्यांचा समावेश आहे.
याकरिता नाव नोंदणी आवश्यक असून उमेश 98 22 50 32 99 लक्ष्मण 90 96 92 22 99 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच सोलापूर शहर व जिल्हा परिसरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर केतकी पाटील व अनिरुद्ध पाटील यांनी केले.
0 Comments