Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्व संताच्या पालखी मार्गावर भाविकांना सुविधा देणे साठी दक्ष रहा - सिईओ जंगम

 सर्व संताच्या पालखी मार्गावर भाविकांना  सुविधा देणे साठी दक्ष रहा - सिईओ जंगम



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सर्व संताच्या पालखी मार्गावर भाविकांना  सुविधा देणे साठी दक्ष रहा. जे कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई होईल. अशा स्पष्ट सुचना देत जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अॅक्शन मोडवर आले आहेत.
जिल्हा परिषदेतील निजी कक्षात जिल्ह्यात प्रवेश करणारे सर्व संताच्या पालखी मार्गावरील संपर्क अधिकारी , नोडल अधिकारी, गटविकास अधिकाकी , विस्तार अधिकारी यांची संयुक्त व्हीसी घेऊन त्यांनी पुर्ण कामाचा आढावा घेतला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंती नरैंद्र खराडे, यांचे सह विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंम यांनी पालखी मार्गाचे १७२ किमी अंतराच्या मार्गातील सर्व ग्रामसेवक यांना स्पष्ट सुचना दिल्या.
सिईओ जंगम यांनी प्रमुख संताच्या पालखी मार्गाचे स्वागत व पुर्ण नियोजना साठी जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुख संपर्क अधिकारी म्हणुन नेमले आहेत.
सर्व मार्गावर मुक्कामाच्या पालखीच्या ठिकाणी गटविकास अधिकारी यांच्या नियुक्त्या करणेत आलेले आहेत.  संपर्क अधिकारी यांनी दररोज चार तासाला कामाचा आढावा घ्या. भाविकांना सेवा देताना काळजी घ्या. वृध्द भाविक , महिला भाविक, लहान मुले, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड ची व्यवस्था, पालखी तळावर शौचालयाची ठिकाणे , पाण्याची व्यवस्था, स्नानगृहाची व्यवस्था, पालखी आगमना पुर्वी पासून ते पालख्या प्रस्थान होई पर्यंत स्वच्छतेची काळजी घ्या. पिण्याच्या पाण्याचे नमुने दोन ठिकाणाहून वेळेत तपासून घ्या. प्रत्येक दिशा दर्शक फलका साठी कलर निश्चित करून देणेत आलेला आहे त्या प्रमाणे दिशा दर्शक फलक असतील याची दक्षता घ्या. अशाही सुचना सिईओ जंगम यांनी दिल्या.

 हालगर्जी पणा करणारेवर कारवाई करणार- सिईओ कुलदीप जंगम
………………………..
वारकरी यांची सेवा म्हणून काम करा. पालखी मार्गावर ज्यांनी नव्याने नियुक्ती आहे त्यांनी पुर्ण काम समजून घ्या. कुणी जर हालगर्जीपणा केला तर कारवाई करणे साठी आपण मागे पुढे पाहणार नाही अशा स्पष्ट सुचना दिल्या. कामात त्रुटी आढळल्यास पंचायत च्या विस्तार अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. अशा स्पष्ट सुचना सिईओ कुलदीप जंगम यांनी दिल्या.

 चालू वर्षाचा निधी यात्रेपुर्वी दिला आहे. मी स्वत पालखी मार्गावरील सर्व ठिकाणी येऊन भेटी दिल्या आहेत. जागेवर प्रत्येक बाबीच्या सुचना दिले आहेत. योग्य नियोजन करून दिले आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करा. कुचराई करू नका. पावसाची दाट शक्यता आहे. पालखी सोहळ्या बरोबर पालखी मार्गावरील नदी काठच्या गावावर पुरस्थिती निर्माण होणेची शक्यता नाकारता येत नाही. सर्व बाबीची काळजी घ्या. पालखी तळावर पालखी येणेचा प्रमुख मार्गा बरोबर भाविकांचा रहदारीचा मार्ग , उभे व आडवे रिंगण सोहळा जाणेचा मार्गावर चिखल होणार नाही याची दक्षता घ्या.
या बैठकीत ग्रामसेवक यांनी मांडलेल्या अडचणी जाणुन घेऊन लक्ष्मी टाकळी येथे जादा शौचालये, स्नानगृह, शेटफळ - पंढरपूर राज्य मार्गावरील धोकादायक खड्डे, याबाबत संबंधित विभागास लेखी सुचना दिल्या. व्हाटसअॅपवर व नेल द्वीरे लेखी सुचना पाठवा त्याची तात्काळ अंमलबजावणी करणेत येईल. असेही सिईओ कुलदीप जंगम यांनी ठामपणे सांगितले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी प्रत्येक पालखी मार्गावरील ग्रामसेवक यांचेकडून देणेत आलेल्या सुविधांचा आढावा घेऊन उर्वरीत कामे वेळेत पुर्ण करणेचे सुचना दिल्या.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी भाविकांसाठीच्या शौचालयाचे सनियंत्रण करणे साठी जिल्हा स्तरावरून नोडल अधिकारी व सहाय्यक कर्मचारी देणेत आलेले आहेत. शौचालयाचे समोर चिखल होणार नाही याची दक्षता घ्या. पुरेसे पाणी उपलब्ध करून द्या अशा सुचना दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments