वारसा मानवतेचा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 12, 2025

वारसा मानवतेचा

 वारसा मानवतेचा


माणूस जन्मजात खूप श्रीमंत आहे...
आलिशान गाडी व आलिशान बंगला आहे...
पण त्याच्या पोटाला संतती चांगली नाही 
मग त्याच्या श्रीमंतीला काहीच अर्थ नाही...

पोटाला संतती जर व्यसनी निघाली...
तर समजा पैसा आणि संपत्ती पाण्यात गेली...
बापाने पैसा व संपत्ती खूप सांभाळून ठेवली...
पण मुलाने मात्र दारू व मटक्यात घालवली...

माणसांनो जीवनात पैसा थोडा कमी कमवा...
पण अगोदर जीवनात चांगली संतती कमवा...
माणसाला जीवनात चांगली संतती असेल...
तर म्हातारपणात त्याला खूप मोठा आधार असेल...

भलेही माणूस पैशाने थोडा गरीब असावा...
पण त्याच्या पोटाला मुलगा व्यसनी नसावा...
तर त्या माणसाला समाजात खूप किंमत असेल...
म्हातारपणात तो मुलगाच त्या बापाची काठी असेल...

हल्ली आपण सगळेजण सर्वत्र पाहतोय...
मुलगा आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतोय...
पत्नीचे ऐकून आई-वडिलांना दूर करतोय...
विभक्त होऊन बायको मुलांत रममान होतोय...

 आईवडिलांनी मुलांना सुसंस्कारी बनवावे...
बालपणापासूनच त्यांना आपल्या धाकात ठेवावे...
म्हणजे ते वाईट व्यसनापासून अलिप्त राहतील...
तुम्हाला म्हातारपणात खूप खूप जीव लावतील...

अतिलाडात वाढलेली मुले बिघडत आहेत...
पुढे चालून व्यसनी व दारुडे निघत आहेत...
आईवडिलांना उतारवयात वाऱ्यावर सोडून 
आणि कुठेतरी लांबच्या दुनियेत जाऊन 
तिकडेच बायको लेकरांत मग्न होत आहेत...


- बुध्दभूषण चंद्रकांत कांबळे 
खंडाळी ता.अहमदपूर जिल्हा लातूर 
मो.7498715661

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages