मायबाप विश्वासाची खाण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 12, 2025

मायबाप विश्वासाची खाण

  मायबाप विश्वासाची खाण


जगात विश्वास ठेवावा कोणावर
हे खरंच काही केल्या समजत नाही...
मित्रावर ठेवावा की सख्या भावावर 
हे काही केल्या उमजत नाही...

लोक म्हणतात विश्वास ठेवावा 
आपल्या जवळच्या व्यक्तीवर...
जवळची व्यक्ती विश्वासघात करते
अन् कारण ढकलते दुसऱ्यावर

लोक म्हणतात नातं विश्वासावर टिकत...
पण नातं स्वार्थापायी विश्वासघात करत...
ही दुनिया फार मतलबी निघाली आहे...
तो विश्वासू आहे याचा काय पुरावा आहे...

हल्ली पत्नीचा पती विश्वासघात करतो...
नवरा बायकोला विश्वासघाती म्हणतो... 
दोष द्यावा कोणाला? पतीला की पत्नीला...? 
दोघंही गुन्हेगार ठरतात विचारा स्वतःला...

मित्रांनो नका ठेऊ विश्वास कोणावर...
फक्त विश्वास ठेवा आई-वडिलांवर...
मायबापाशिवाय आपला कोणी विश्वासू नाही
सख्ख्या भावाशिवाय दुसरा कोणी साथीदार नाही

लोक म्हणतात माझ्यावर विश्वास नाही का? 
पण खरंच त्यांच्यावर विश्वास ठेवल्यावर 
ते आपल्याला विश्वास दाखवतात का? 
आता तुम्ही सांगा विश्वास कोणावर ठेवायचा? 

जगात आहेत विश्वासू लोक पण तेही कमीच...
कधी विश्वास दाखवतात तर कधी विश्वास कमीच...
जगात विश्वासाची खाण म्हणजे मायबाप...
दुसऱ्यावर विश्वास ठेवणे म्हणजे डोक्याला ताप...

- बुध्दभूषण चंद्रकांत कांबळे 
खंडाळी ता.अहमदपूर जिल्हा लातूर 
मो.7498715661

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages