श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील ७५ कमांडो तैनात
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र कमांडो फाउंडेशन संचलित रेस्क्यू कमांडो फोर्स नातेपुते जिल्हा सोलापूर येथील ७५ कमांडो श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पुणे शहर व ग्रामीण हद्दीत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथासोबत भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनासोबत. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त मिलिंद मोहिते, पोलीस उप-आयुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन चे काम पाहत आहेत.यामध्ये भाविक वारकरी भक्तांना सुरक्षितेच्या दृष्टीने सुलभ व जलद दर्शन देणे तसेच पालखी सोहळा सोबत असलेली दिंडीतील वाहने यांना पालखी मार्गावर तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत राहून रस्त्यावरील वाहने विनाअडथळा सुरळीत मार्गाने काढून देणे, गर्दीत कोणी जखमी झाल्यास त्यांना प्राथमिक उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेणे त्यांना वेळेवर उपचार मिळवून देणे असे अनेक आपत्ती व्यवस्थापन ची कामे पालखी सोहळ्यात महाराष्ट्र कमांडो फाउंडेशन संचलित रेस्क्यू कमांडो फोर्स. चे कमांडो करत आहेत.
गेले २००० साला पासुन महाराष्ट्र कमांडो फाउंडेशन संचलित रेस्क्यू कमांडो फोर्स ही पोलीस प्रशासन व सोलापूर जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. गेले २३ वर्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत कमांडो फोर्स मधील कमांडो वारीमध्ये रथासोबत राहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर आपत्ती व्यवस्थापन चे काम पाहतात.
0 Comments