नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 18, 2025

नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव

 नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरातील शैक्षणिक वर्तुळात वेगळा ठसा उमटविलेल्या नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये ९ जून  'विद्यारंभ दिन' मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार करजगी, सचिवा सौ. वर्षा विभूते, विश्वस्त नंदिनी करजगी, मोहिनी करजगी, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या सौ. रुपाली हजारे, कॉलेजच्या प्राचार्या सौ. स्मिता कुलकर्णी, धनेश कडते सरपंच, गणेश पोतदार, कुंभार, चंद्रकांत निंगफोडे, महादेव मंगरुळे व महादेव पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कै. नागेश करजगी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा वाजली. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवा डबा, नवे दप्तर, वह्या, पुस्तकांची नवलाई असताना आपल्या मित्रमंडळींना भेटण्याची उत्सुकता होती तर दुसरीकडे पूर्व प्राथमिक विभागातील चिमुरड्यांनी पहिल्यांदाच पालकांसमवेत शाळेत पहिले पाऊल टाकले. नव्याची नवलाई असली तरी सारेच काही अनोळखी असल्याने त्यांच्याकडून आई-वडिलांना काही सोडवत नव्हते. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्याच्या दृष्टीने शाळेने जय्यत तयारी केली होती. वर्गातही आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संस्थेचे अध्यक्ष कुमार करजगी यांनी आपल्या भाषणातून उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले व शैक्षणिक वर्षाकरिता शुभेच्छाही दिल्या व सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे स्वागत केले. सौ.पुष्पा ढवळे यांनी शाळेबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. प्रज्ञा वट्टे व सौ. दिपाली नरगिडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages