शिवस्वराज्य दिनानिमित्त गुणवंत पाल्यांचा गौरव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवस्वराज्य दिनानिमित्त शिक्षण विभाग माध्यमिक व मराठा सेवा संघ जिल्हा परिषदे शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेचे कर्मचारी व जिल्हा परिषद बीट पत्रकार यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात माध्यमिक शिक्षण विभाग व मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, गायक मोहंमद अय्याज, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे, उप शिक्षणाधिकारी स्वाती हवेले, कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव दिनेश बनसोडे सचिन चव्हाण विशाल घोगरे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते. प्रारंभी मोहम्मद आयाज यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आई वडील व गुरुजनांनी दाखविलेल्या मार्गावर विद्यार्थ्यांनी वाचवा वाटचाल ठेवावी असे त्यांनी आवाहन केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज अचानक सोलापूर दौऱ्यावर आल्यामुळे तसेच शाळांचा प्रवेशोत्सव असल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे व्यस्त होते. तरीही या कार्यक्रमात वेळ काढून त्यांनी झेडपी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी हजेरी लावली. त्यामुळे गुणवंताचा आनंद द्विगुणित झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत मोहिते रवींद्र करजगीकर, रणजीत घोडके, अनिल पाटील श्रीकांत धोत्रे, चेतन भोसले यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवी सर यांनी केले व आभार मेहताब शेख यांनी मानले.
या गुणवंतांचा झाला सन्मान...
दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या पुढील विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सिद्धी घोडके, मंजिरी मसलकर, सई सारोळे, शर्वरी जाधव, अथर्व पाटील, अनिश कांबळे समृद्धी मीठा, संबोधी खंडागळे, श्रुती मंगरूळे, अस्मिता गौडगाव, ऋग्वेद पाटील, कौस्तुभ भोसले, आदिती दराडे, राजलक्ष्मी सुतार, नयन कांबळे, समर्थ मोहिते, समर्थ सोनवणे, पूर्वा पवार, आर्या पवार, आश्लेषा शेरकर, सारा शेख, गायत्री पवार, आर्या देशमुख, मयांक क्षीरसागर, अभ्रा शिंदे अवंती खराडे, मोहम्मद जैद मनेरी, श्रेया भडंगे रघुनंदन जाधव, आदित्य शिंदे, सना शेख, प्रणती देवकुळे, साक्षी केकडे, सार्थकी बनसोडे, रिद्धी माळी, सुवर्णा गायकवाड, सौम्या पेरला, फुरकान शेख, प्रांजल माडेकर, आर्यन जाधव, प्रियंका काळे, अथर्व मोहिते, पल्लवी गाडपल्ली, श्रेयस थिटे, जानवी जगताप, सार्थक अडसूळ, पृथ्वीराज दराडे, समृद्धी लेंडवे, श्रेया क्षीरसागर प्रतीक काशीद, हर्षद पाटील, उदयभान कोरे, संजना टेके.
0 Comments