माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा अकलूज येथील केंद्र बदल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 30, 2025

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा अकलूज येथील केंद्र बदल

 माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा अकलूज येथील केंद्र बदल  

 

सेालापूर (कटूसत्य वृत्त):-  माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जून / जुलै 2025 मध्ये होणा-या परीक्षेवेळी दिनांक 01 जुलै 2025 रोजी जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे मुक्काम व रिंगण सोहळा आहे. त्याठिकाणी लाखों वारकरी भक्त जमा होतात. अशी माहिती  गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, माळशिरस ता माळशिरस, जि. सोलापूर  यांनी दिली. त्यामुळे दिनांक 30 जून 2025 ते 1 जुलै 2025 या दोन दिवसासाठी परिक्षेचे नियोजन बदलणेत आलेले आहे. सदर पत्राच्या अनुषंगाने त्यांनी दि. 30 जून 2025 ते 1 जुलै 2025 या कालावधीकरीता सदर परीक्षा केंद क्रमांक 3102 हे ठिकाण सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज याऐवजी कृष्णानंद विद्यामंदिर, पाटील वस्ती, (अकलूज) माळशिरस रोड, ता माळशिरस, जि सोलापूर या शाळेत परीक्षा केंद्रावर आयोजित करण्याबाबत पूर्ण नियोजन केलेले आहे. मा विभागीय सचिव,  विभागीय मंडळ, पुणे यांनी याबाबत नियोजन करण्याबाबत कळविलेले आहे.

तरी उपरोक्त शाळेच्या ठिकाणी कृष्णानंद विद्यामंदिर, पाटील वस्ती, (अकलूज) माळशिरस रोड, ता माळशिरस, जि सोलापूर दिनांक 30 जून 2025 ते 1 जुलै 2025 या दोन दिवशी पोलिस बंदोबस्त बदलेल्या ठिकाणी देण्यात यावा. या नंतरचे सर्व पेपर मुळ सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज या ठिकाणीच होतील.

अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी दिली आहे.

                                                    00000

 

 

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत –अनुदान, बिजभांडवल योजना व थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग,मातंग,मिनी-मादींग, मादींग,दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील लोकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी महामंडळामार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येतात, सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) सोलापूर जिल्हयाकरिता अनुदान योजना- भौतिक उद्दिष्ट 75 यामध्ये आर्थिक उद्दिष्ट रक्कम रु.36.50 लाख व बीजभांडवल योजने अंतर्गत भौतिक उद्दिष्ट 75 यामध्ये आर्थिक उद्दिष्ट रु.525.00 लाख प्राप्त झाले आहे.

महामंडळाचे दि. 17 जून 2025 च्या पात्राअन्वये 20 कलमी कार्यक्रम 2006 कलम 10 (34) अनुसार महामंडळामार्फत राबविण्यात येत आसलेल्या अनुदान योजना, बिजभांडवल योजना तसेच थेट कर्ज योजनाअंतर्गत मांतग समाज व तत्सम 12 पोटजातीतील लोकांना आर्थिक लाभ देण्याकामी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाकरिता महामंडळाने निश्चित केलेल्या जिल्हानिहाय भौतिक व आर्थिक उदिष्ट प्राप्त झाले आहे. करिता जिल्हा कार्यालय सोलापूर मार्फत अनुदान योजना, बिजभांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना या योजनांमध्ये कर्ज मागणी अर्ज वितरण करणे व अर्ज स्विकारण्याचे काम सुरु करण्यात आली आहे.

तरी वर उल्लेख केलेल्या जातीतील इच्छुक, गरजु व होतकरुनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, 2 रा माळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बीग बजार समोर. सोलापूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा असे, आवाहन जिल्हा व्यवस्थापक, सोलापूर आर. एच. चव्हाण, यांनी केले आहे.

                                      0000

 




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages