छ.शाहू महाराज जयंतीनिमित्त दहिगाव येथे वृक्षारोपणासह विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पुरोगामी महाराष्ट्र व दादासाहेब साळवे परिवाराच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त वृक्षारोपण व हायस्कूल तसेच जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच 15 अंगणवाडी तील विद्यार्थ्यांना पुस्तक संच देण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नातेपुते पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस अधिकारी एपीआय बसवेश्वर जकीकोरे साहेब हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दहिगाव येथील ऐतिहासिक असणारी वेस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच नरवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ए.पी.आय बसवेश्वर जकीकोरे व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार केशर आंब्याचे वृक्ष भेट देऊन करण्यात आले.या प्रसंगी तालुका महिला बालविकास अधिकारी आसमा आतार मॅडम, कळंबोली केंद्रप्रमुख सिद्धेश्वर भरते सर, दहिगा हायस्कूलचे अध्यक्ष वंदनादेवी मोहिते,वनिता देवी पाटील,जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा मोरे,सरपंच,सोनम ताई खिलारे, विजय साळवे सर,मुख्याध्यापक चव्हाण सर, माजी उपसरपंच विजयसिंह पाटील,पोलीस पाटील विठ्ठल मोरे, ज्येष्ठ मा.शिक्षक दीक्षित सर,किर्दक सर,अशोक रुपनवर सर,मुख्याध्यापक वनसाळे सर,अमोल खरात सर,उद्धव सावंत,सचिन किर्दक,मेजर महेश चिकणे,रणजीत खिलारे सर, अक्षय मोरे, नितीन मोरे,उपसरपंच सर्व सदस्य अंगणवाडी सेविका,शिक्षक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक दादासाहेब साळवे सर व पुरोगामी महाराष्ट्रचे प्रमुख जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य पत्रकार प्रमोद शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी केले.
(दोन्ही फोटो वापरणे)
फोटो ओळ- 1)विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना मान्यवर,2) वृक्षारोपण करताना एपीआय बसवेश्वर जकीकोरे, प्रमोद शिंदे,ऋतुजा मोरे दादासाहेब साळवे वंदनादेवी मोहिते व मान्यवर,
0 Comments