Hot Posts

6/recent/ticker-posts

थेऊर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना ‘आयुष सेवाभावी संस्थेमार्फत’ वह्यांचे वाटप

 थेऊर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना ‘आयुष सेवाभावी संस्थेमार्फत’ वह्यांचे वाटप


थेऊर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ‘आयुष सेवाभावी ' संस्थेच्या माध्यमातून  आणि थेऊर मधील तरुण पिढीने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना वह्या आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले.

           विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी ‘आयुष सेवाभावी संस्थेच्या’ माध्यमातून, थेऊर येथील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना, वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच थेऊर मधील अंगणवाडी विद्यार्थ्यांना, पैशाच्या बचतीची सवय लागावी म्हणून, गल्ल्यांचे देखील वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठबळ देण्याचा उद्देश ठेवून करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधे शैक्षणिक उत्साह वाढला आहे. पालकवर्गाने या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामण काकडे, राहुल कांबळे, माजी उपसरपंच भरत कुंजीर, नवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष नवनाथ कुंजीर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तांबे, रामचंद्र बोडके, मयुर कुंजीर, गोरख काळे, आनंद वैराट, सोमनाथ खंडागळे, गणेश चव्हाण, नाना शेडगे, मेहब्बुब सय्यद, रामदास चव्हाण, कैलास सावंत, अजय जाधव, सचिन चव्हाण, रामदास भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments