शास्ती माफ करून कर वसुलीसाठी "अभय योजना" राबवा- मोहसीन शेख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 14, 2025

शास्ती माफ करून कर वसुलीसाठी "अभय योजना" राबवा- मोहसीन शेख

 शास्ती माफ करून कर वसुलीसाठी "अभय योजना" राबवा- मोहसीन शेख



अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज नगरपरिषद क्षेत्रामध्ये अनेकवेळा मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम जास्त असणे, मालमत्ता धारकांची आर्थिक अडचण असणे या व इतर कारणांमुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यात येत नाही. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,१९६५ चे कलम १५० (अ) (१)  नुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत यांचेकडून दरमाह २ टक्के शास्ती लावण्याचे प्रावधान आहे. यामुळे मालमत्ता धारकांच्या एकूण थकबाकी मध्ये वाढ होऊन याचा विपरीत परिणाम कर वसुलीवर होतो. यावर उपाययोजना म्हणून नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसूल करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना लागू करण्याबाबत अकलूज नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी श्री खुळे यांना निवेदन देण्यात आले.

 महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे या "अभय योजना" ची तूर्तास अंमलबजावणी झाल्यास अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच अकलूज नगरपरिषद स्थापनेपासून प्रलंबित सर्व थकित मालमत्ता कर आकारणी करण्यास ही नागरिकांचे अपेक्षित असे सहकार्य होईल ; यात शंकाच नाही. नगरपरिषद प्रशासनाने सामाजिक महत्त्वाकांक्षा ठेवून कोणतेही निर्बंध न लादता अभय योजने बाबत धोरणात्मक निर्णय घ्यावे ; असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा कार्याध्यक्ष मोहसीन शेख यांनी व्यक्त केले. अन्यथा नाईलाजाने मालमत्ताधारकांसह नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करू असा मार्मिक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाकडून देण्यात आला आहे.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शप युवक चे ता.कार्याध्यक्ष अमोल माने, फारुक शेख, समीर काझी, लखन लोखंडे,फरीद काझी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages