Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्याच्या युवा धोरण समितीवर आ.देवेंद्र कोठे यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड

 राज्याच्या युवा धोरण समितीवर आ.देवेंद्र कोठे यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर आमदार देवेंद्र कोठे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण २०१२ चा आढावा घेऊन सुधारित युवा धोरण बनविण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्याकरिता शासनाची ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीवर आमदार देवेंद्र कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सुनील पांढरे यांनी याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जाहीर केला आहे.
आमदार देवेंद्र कोठे यांच्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आदींनी अभिनंदन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments