महापालिका शाळेमध्ये लेखन साहित्याचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विजापूर नाका येथील मनपा मुलांची मराठी केंद्रशाळा क्र. 4 सोलापूर या शाळेमध्ये दिवंगत सुधामती लिंबाजी शिरसाट यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसाट यांच्या वतीने लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.
इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पेन व वही असे लेखन साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका पूनम बनसोडे, मुख्य आरोग्य निरीक्षक शकील नल्लामंदू , महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, हमीद हिरोली , महापालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन भालचंद्र साखरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर अथक अभ्यास करून आपले ध्येय गाठावे. सोलापूर शहर आणि देशाची सेवा करावी, असे आवाहन माजी नगरसेविका पूनम बनसोडे यांनी केले. इतर मान्यवरांनी आपल्या भाषणात शाळेचे विविध उपक्रम, स्वच्छता आणि संस्काराचे कौतुक केले.
संयोजक शेषराव शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपत आईच्या स्मरणार्थ दरवर्षी असे उपक्रम राबविण्यात येतात असे सांगून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन उमा चंदनशिवे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष जाधवर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जाधवर, उमा चंदनशिवे, विजय टेकाळे, राजश्री व्हनगुंडे, गीता ढाकणे, अमृता नांदवटे, रियाज नदाफ, विशाल मनाळे, रत्नमाला नवगिरे, मनीषा कांबळे यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी चंद्रकांत ओव्हाळ, राहुल बाबरे, रोहन वाघमारे, राजू गवळी, अनिल लुमड, दयानंद बनसोडे आदींसह कर्मचारी, शिक्षक वृंद आणि परिवार उपस्थित होता.
0 Comments