जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 2, 2025

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे जागतिक तंबाखू

 विरोधी दिवस

साजरा.


 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-    मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार,  अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर एम. एस. शर्मा,  तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 31 मे 2025 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला.
जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करताना, तंबाखूमुळे होणा-या आरोग्याच्या हानीबाबत जनजागृती करणे हा या दिवस साजरा करण्याचा उददेश आहे. तंबाखू सेवनामुळे हदयाला त्रास होतो, फुफ्फुसे निकामी होतात, पक्षाघात होतो, कर्करोग आणि मधुमेहाचा धोका ही वाढतो. दरवर्षी तंबाखू सेवनामुळे लाखो लोकांचा मत्यू होतो त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे प्रचार व प्रसार करण्यात आले आहे. यावेळी लोकअभिरक्षक कार्यालयाचे प्र. मुख्य लोकअभिरक्षक शिव झुरळे यांचे समवेत अॅड. सोलनकर, अॅड. म्हेत्रे व सर्व विधिज्ञ, कर्मचारी व महाराष्ट् सुरक्षा बला चे जवान यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.
सदर कार्यक्रम यशस्वी करणेकरीता  उमेश देवर्षी सचिव यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक एस.ए.जी. नदाफ, तसेच कर्मचारी बाजीराव जाधवर,  प्रविण विभुते, प्रसन्न गुळेद, श्रीमती काजल चव्हाण,  एल.एच. शेख यांनी प्रयत्न केले. अशी माहिती अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या कडून देण्यात आली.
                                                      

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages