विठ्ठल कारखान्याच्या उपोषणास माढा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पाठींबा
माढा (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर (ता. पंढरपूर) या कारखान्यास महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर एनसीडीसी संस्था नवी दिल्ली यांच्याकडून मिळालेल्या ३४७. ६७ कोटी रुपये कर्ज रकमेपैकी मागील थकीत व्यापारी पेमेंट ५९.७५ कोटी व कामगार पेमेंट साठी ४१.८७ कोटी रक्कम देण्यात यावी, असे सूचित करण्यात आलेले असताना देखील सदरची रक्कम व्यापारी पेमेंट व कामगारांसाठी वापरण्यात आली नसल्याचा आरोप करीत याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी व्यापारी संतोष माणिक भालेराव, इतर व्यापारी व कर्मचारी केशव शेळके, रामचंद्र भूसनर, निवृत्ती गोडसे व इतर कर्मचारी यांनी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर सोमवार, दि.२६ मे २०२५ पासून आमरण उपोषण सुरु केलेले आहे.
या उपोषणास माढा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी पदाधिकार्यासमवेत पुण्यात उपोषण स्थळी जाऊन आमदार अभिजीत पाटील यांच्या भुमिकेचा जोरदार शब्दांत निषेध करीत झोपेचे सोंग काढून आमदार पाटील यांनी तत्परतेने व्यापारी कामगारांचे पैसे द्यावेत.अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा साठे यांनी दिला. यावेळी मुन्ना साठे,धर्मराज मुकणे,उदयसिंह कदम,महेश मोहोळे,बालाजी बारबोले आदी उपस्थित होते.
0 Comments