सुनील वाघमोडे यांना गुरुविद्या बसव शरण पुरस्कार
मोहोळ / (कटुसत्य वृत्त):- लांबोटी (ता. मोहोळ) येथील उद्योजक सुनील वाघमोडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना बसव जयंती निमित्त गुरुविद्या प्रतिष्ठानकडून माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते 'गुरूविद्या बसव शरण दांपत्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
प्रत्येक वर्षी सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केलेल्या गुरुविद्या प्रतिष्ठानकडून गुरुविद्या बसव शरण दांपत्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावेळी हा पुरस्कार लांबोटी येथील युवा उद्योजक सुनील वाघमोडे यांना माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
0 Comments