Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जल्लोषी मिरवणुका

 छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जल्लोषी मिरवणुका



सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी (दि. १४) सार्वजिनक मंडळाच्या वतीने लक्षवेधी मिरवणुका काढल्या. रंगबेरंगी विद्युत रोषणाई, डिजेचा दणदणाट, संभाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारे विविध देखावे, 'ऑपरेशन सिंदूर देखावे अशा मोठ्या शिवमय वातावरणात मिरवणुका निघाल्या.


शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंदी व मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी मंडळांनी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, प्रतिमेची प्रतिष्ठापना केली होती. बुधवारी सायंकाळी चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये जवळपास ३० मंडळे सहभागी झाली होती. मिरवणुकीत सहभागी मंडळानी आकर्षक देखावे सादर केले. धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने राज्याभिषेक सोहळा, शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने कवी कलश आणि संभाजी महाराज यांना अटक झाल्यानंतर शत्रूच्या दारात असताना देखिल मित्र कवी कलश यांचे कौतुक करणारा देखावा, भोईराज तरुण मंडळाने किल्ले पुरंदरचा हलता देखावा, धाकल धनी प्रतिष्ठानच्या वतीने गद्दारी करणाऱ्या हत्तीच्या पायाखाली देण्यात येणाऱ्या शिक्षेचा देखावा केला होता. मराठा वस्ती येथील संभाजी राजे तालीम मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांची मोठी मूर्ती सादर केली तर काही मंडळानी इतिहासकालीन माहिती सांगणारे फलक सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चार पुतळा हुतात्मा चौक ते सरस्वती चौक, नवी वेस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरूषन मिरवणुकते छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे रात्री उशिरा मिरवणूकीची सांगता करण्यात आली. मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदारबस्त ठेवण्यात आला होता. विविध सार्वजनिक , समाजिक मंडळाच्या वतीने शिवप्रेमीसाठी भोजन केल्याचे पहावयास मिळाले.


Reactions

Post a Comment

0 Comments