॥ अक्कलकोट : (कटुसत्य वृत्त):- संघाच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिरंजीव तथा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अकलूज येथील मराठा सेवा संघाच्या वतीने ३ दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाच्या सांगता कार्यक्रमाप्रसंगी जन्मेजयराजे भोसले यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे होते. या कार्यक्रमास स्वागत अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घोगरे, कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे आदी उपस्थित होते.
0 Comments