मोहोळ / (कटुसत्य वृत्त):- दहावीच्या परीक्षेत मोहोळ तालुक्याचा एकूण निकाल ९३.५३ टक्के इतका लागला असून यामध्ये मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक असून, मुलींचा निकाल ९६.५८ टक्के व मुलांचा निकाल ९०.९६ टक्के इतका आहे. मोहोळ तालुक्यातील इयत्ता दहावीच्या एकूण ६६ शाळांपैकी १६ शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा राखली आहे. यावर्षी एकूण ४०३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मोहोळ शहरातील थील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेची विद्यार्थिनी प्रगती रत्नदीप जानराव हिने ९७.८० टक्के इतके गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
तालुक्यातील ६६ शाळेचा गुणांच्या आधारे विद्यार्थी वर्गवारीमध्ये डिस्टिंक्शन ९५१ विद्यार्थी, ग्रेड एक १३६५ विद्यार्थी, ग्रेड दोन १०९९ विद्यार्थी, पास ३५९ विद्यार्थी झाले आहेत. तर १६ शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा राखली आहे. यामध्ये मोहोळ शहरातील नेताजी प्रशालेचा निकाल ९७.४९ टक्के, प्रथम साक्षी नारायण नीळ ९६.४० टक्के, द्वितीय तृप्ती उदय काळे ९५ टक्के, तृतीय अर्चित शहाजी सोनटक्के ९१.८० टक्के लागला आहे. तर नागनाथ विद्यालय मोहोळ प्रथम प्रिया बबन काळे ९६ टक्के, द्वितीय सृष्टी अतिन क्षिरसागर ९४.६० टक्के, तृतीय अब्दुलरहमान किरोज शेख ९२.८० टक्के, तर राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ ९५.४५ टक्के निकाल तर या शाळेने यंदाही यशाची परंपरा राखली आहे. शाळेची जानराव प्रगती रत्नदीप हिने ९७.८० टक्के, मिळविले आहेत. द्वितीय गरगडे स्नेहल शिवदास ९६.२० टक्के, तृतीय डोके अथर्व प्रवीण ९४.०० टक्के, गुणांची श्रेणीवार यशस्विता ९० टक्के पेक्षा जास्त गुण २० विद्यार्थी, ८० टक्के पेक्षा जास्त ३८ विद्यार्थी, ७० टक्के पेक्षा जास्त ३४
विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
तर कै. संभाजीराव गरड विद्यालय, मोहोळ १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. मराठी माध्यम प्रतीक्षा बाळासाहेब इंगोले ९१.६० टक्के, हुमेरा शकील अहमद बागवान ८९.२० टक्के, श्रावणी संतोष थोरात ८९ टक्के, इंग्रजी माध्यमः पायल राजेंद्र राऊत ९२.६० टक्के, निर्मिती नितीनकुमार पाटील ९२ टक्के, पूजा ओम कळसे ८८.६० टक्के. श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल विद्यामंदिर निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये शिपा कैमुद्दीन शेख ९६ टक्के, विवेक त्रिपाल पवार ९१ टक्के, तर प्रणव संतोष अंकुश ९९.२० टक्के.
तालुक्यातील शारदा विद्यामंदिर कोन्हेरी शाळेचा एकूण निकाल ८९.७४ टक्के लागला असून प्रथम संजीवनी अण्णा तरंगे ८९ टक्के. तंजीला रहीम शेख ८८.२० टक्के, साक्षी अपासाहेब देवकते ८५.८० टक्के, शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर येथून २९९ विद्यार्थ्यांपैकी २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा शेकडा निकाल ९७.३२ टक्के इतका आहे. ९० टक्के पेक्षा अधिक गुणांची विद्यार्थी ९ असून विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी ९७ आहेत विद्यालयातील प्रथम क्रमांक प्रतीक प्रशांत शिंदे ९६ टक्के, द्वितीय ईश्वरी मुकुंद गोटे ९५.४० टक्के, तृतीय रचना राजेंद्र मते ९४.६० टक्के व तनिष्क गणेश सोनटक्के ९४.६० असे गुण मिळवले आहेत. सौ. रा. रा. पाटील माध्यामिक विद्यालय व ज्यु. कॉलेज पेनूर चा निकाल ९८.६६ टक्के यामध्ये प्रथम क्रमांक सानिका विठ्ठल कारंडे ९२.६० टक्के, द्वितीय श्रुती देविदास रणदिवे ८७.६० टक्के, तृतीय क्रमांक समर्थ सचिन चवरे ८७.६० टक्के असे गुण मिळवले आहेत.
चौकट
तालुक्यातील ६६ शाळांमधील १६ शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा राखली आहे. यामध्ये नूतन विद्यालय आष्टी, आण्णाभाऊ साठे प्रशाला खंडाळी, अंबिका विद्यामंदीर शिरापूर सो, विद्यानिकेतन प्रशाला मसले चौधरी, श्रद्धा इंग्लिश मेडियम स्कूल मोहोळ, डी. एम. गरड विद्यालय मोहोळ, अनु. जाती व नवबौद्ध शासकीय शाळा नजिक पिंपरी, एम. बी. चव्हाण गुरुकुल कामती, कै. ना.बा. चव्हाण विद्यालय तेलंगवाडी, महात्मा गांधी विद्यालय वाघोली, संभाजीराव शिंदे प्रशाला इंचगाव, मा.म.भा. डोंगरे विद्यालय टाकळी (सि), बमाध्यमिक प्रशाला वडवळ, न्यू इंग्लिश स्कूल सय्यद वरखडे, श्री दत्त प्रशाला मोहोळ रेल्वे स्टेशन, बजय महाराष्ट्र विद्यालय हिंगणी नि. या शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा राखली.
0 Comments