Hot Posts

6/recent/ticker-posts

आषाढीसाठी २० कोटींची मागणी

 आषाढीसाठी २० कोटींची मागणी






सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, शौचालये, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधांसह इतर सर्व सोयी- सुविधांसाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे २० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.


सीईओ जंगम म्हणाले, जुलै महिन्यात आषाढी वारी आहे. सर्व पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टींमध्ये जातीने लक्ष देऊन नियोजन  करत आहेत.


पालखी सोहळा नियोजनाच्या अनुषंगाने यंत्रणांना तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आषाढी वारीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्व विभागाकडून तयारी सुरू झाली आहे.


चौकट १ 

विभागनिहाय निधीची केलेली मागणी

पाणी व स्वच्छता : १८ कोटी ग्रामीण पाणीपुरवठा : दोन कोटी २० लाख आरोग्य विभाग : ५० लाख ग्रामपंचायत विभाग : १५ लाख एकूण : २० कोटी ८५ लाख रुपये


 चौकट २ 

गतवर्षीचा २५ टक्के निधी रखडला मागील आषाढी वारीवेळी जिल्हा परिषदेने शासनाकडे १६ कोटी रुपयांचा निधी मागितला होता. मात्र, शासनाने त्यातील फक्त ७५ टक्के म्हणजे १२ कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, वारीत त्यापेक्षा जास्त निधी खर्च झाला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी किती निधी मिळणार, याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments