मोहोळच्या श्रद्धा इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल
पोखरापूर : (कटुसत्य वृत्त):- मोहोळ येथील गजानन बहुउद्देशीय संस्था संचलित श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.
प्रशालेतील सिफा कैमुद्दीन शेख हिने ९६ टक्के गुण घेऊन प्रशालेत प्रथम क्रमांक तर तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला.
विवेक त्रिपाल पवार याने ९१ टक्के गुरुदत्त प्रशालेत द्वितीय तसेच तृतीय प्रणव संतोष अंकुश याने ९०.२० टक्के गुण मिळवले. श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक सचिव सुनील झाडे, संचालक सृष्टी झाडे, कार्यकारी सदस्य मोहित झाडे, प्रथमेश झाडे, मिलन ढेपे व धरती पाटील, मुख्याध्यापिका वीणा कदम, सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments