Hot Posts

6/recent/ticker-posts

क्लास न लावता स्नेहल सुरवसे हिने मिळविले ९१.२० टक्के

 क्लास न लावता स्नेहल सुरवसे हिने मिळविले ९१.२० टक्के


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत स्नेहल नेताजी सुरवसे ९१.२० टक्के गुण मिळवत यश मिळविले आहे. नेताजी प्रशालेतील विद्यार्थिनी व वडाचीवाडी या गावातील उद्योजक नेताजी आणि स्वाती सुरवसे यांची कन्या स्नेहल सुरवसे हिने दहावीच्या परीक्षेत क्लास न लावता ९१.२० टक्के गुण घेऊन यश संपादन केले.
    नेताजी प्रशालेचा दहावीचा निकाल ९७.४९ टक्के लागला आहे. स्नेहल सुरवसे हिने क्लास न लावता हे यश संपादन केले आहे त्याबद्दल तिचे आई-वडील, शिक्षक, नातेवाईक, गावकरी यांनी कौतुक केले. तिला आई-वडील आणि शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
   स्नेहल सुरवसे हिने मिळविलेल्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काशीद व नेताजी विद्या विकास मंडळाचे चेअरमन डॉ. एम.ए.गायकवाड व अध्यक्ष डॉ. प्रमोद पाटील यांनी अभिनंदन केले. 
Reactions

Post a Comment

0 Comments